
रिया सेनने वयाच्या पाचव्या वर्षी आपल्या करिअरला सुरुवात केली होती. १९९१मध्ये’विषकन्या’चित्रपटात तिने बालकलाकाराची भूमिका साकारली होती. या चित्रपटात तिची आई मुनमुन सेन मुख्य अभिनेत्री होती. रियाने’स्टाइल’, ‘झंकार बीट्स’,मल्याळम हॉरर फिल्म’अनंतभद्रम’, ‘नौका डूबी’यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र,या चित्रपटांमधून रियाला इंडस्ट्रीत विशेष ओळख मिळवता आली नाही. हिंदी व्यतिरिक्त तिने बंगाली,इंग्रजी,तामिळ आणि तेलुगू भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले. रिया सेनला बॉलिवूडची ‘कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन’ देखील म्हटले जाते. अभिनेत्री तिच्या चित्रपटांसाठी कमी, पण वादांसाठी जास्त चर्चेत होती.








