
झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात जिनिलियालाल ‘वेड’ या चित्रपटासाठी पुरस्कार देण्यात आला आहे. वेड हा चित्रपट ३० डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात जिनिलिया आणि रितेश सोबत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी, सिद्धार्थ जाधव आणि जितेंद्र जोशी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तसेच बॉलिवूडचा भाईजान सलमान खानहा एका गाण्यात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसत आहे. रितेशचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. तर जिनिलियाने देखील या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन ४५ दिवस झाले आहेत तरी देखील चित्रपटाची कमाई सुरुच आहे.