
ऋषी कपूर यांनी या चित्रपटात अमिताभ यांच्या भूमिकेसाठी शशी कपूर यांना घेण्याचे सुचवले होते. यानंतर या चित्रपटात शशी कपूर यांची एन्ट्री झाली. ‘दुनिया मेरी जेब में’ या चित्रपटात ऋषी कपूर, नीतू सिंह आणि शशी कपूर यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. त्यांचा हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. नंतर जरी ऋषी कपूर आणि अमिताभ बच्चन यांनी एकत्र चित्रपट केले असले तरी, त्यावेळी मात्र दोघेही एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. अमिताभ बच्चन यांच्यासाठी काही खास भूमिका लिहिल्या जायच्या, अशी ऋषी कपूर यांची समजूत होती.








