
Happy Birthday Richa Chadha: बॉलिवूड अभिनेत्री ऋचा चड्ढा आज (१८ डिसेंबर) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. १८ डिसेंबर १९८६ रोजी पंजाबच्या अमृतसरमध्ये जन्मलेल्या ऋचाने बॉलिवूडमध्ये अनेक दमदार भूमिका केल्या आहेत. पंजाबमध्ये जन्मलेली ऋचा चड्ढा लहानाची मोठी मात्र दिल्लीत झाली आहे. अभिनेत्री ऋचा चड्ढाने तिचे संपूर्ण शिक्षण देखील दिल्लीतून पूर्ण केले. ‘फुक्रे’ आणि ‘गँग्स ऑफ वासेपूर’ यासारख्या दमदार चित्रपटांमध्ये दिसलेली ऋचा चड्ढा हिने आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावले बॉलिवूडमध्ये एक हक्काची जागा निर्माण केली आहे. ऋचा चड्ढा तिच्या चित्रपटांसाठीच नाही, तर तिच्या स्पष्टवक्ते विधानांमुळे देखील नेहमीच चर्चेत असते. ऋचा चड्ढा ही आता जरी गाजलेली अभिनेत्री असली तरी, तिला नेहमीच एक पत्रकार बनायचे होते.








