
हर्षवर्धन कपूर
बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर याचा मुलगा हर्षवर्धन कपूर याच्यासोबत रिया चक्रवर्तीचे नाव जोडले गेले होते. २०१७मध्ये रिया चक्रवर्ती हर्षवर्धन कपूरसोबतच्या तिच्या नात्यामुळे चर्चेत येऊ लागली होती. अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन आणि रिया अनेकदा एकमेकांची मस्करी करताना दिसायचे. रियाच्या वाढदिवसाच्या पार्टीतही ते सोबत दिसले होते. अनेक प्रसंगी दोघे एकत्र हँग आउट करतानाही दिसले होते. मात्र, हर्षवर्धनची सारा अली खानसोबत जवळीक वाढल्यानंतर रिया आणि तो वेगळे झाले.








