
कल्याण (प्रतिनिधी): डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभिवादन समिती (अंतर्गत) (रजि.) यांच्या वतीने बहुजन महामाता जनजागृती महोत्सव २०२५ चे आयोजन दिनांक २३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञानकेंद्र (स्मारक), कल्याण (पूर्व) येथे करण्यात आले आहे. या महोत्सवात समाजातील प्रेरणादायी महिलांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी राजमाता जिजाऊसाहेब भोसले पुरस्कार २०२५ धम्मसेविका/समाजसेविका विशाखाताई थोरात यांना जाहीर झाला आहे.
या जनजागृती महोत्सवाचा उद्देश बहुजन समाजामध्ये सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक जाणीवा निर्माण करणे तसेच राजमाता जिजाऊसाहेब भोसले, ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले व त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या कार्याचा जागर प्रचार करणे हा आहे.
समाजातील धाडसी, कर्तबगार व लढाऊ कार्यकर्त्या म्हणून ओळख असलेल्या विशाखालाई थोरात यांनी अन्याय, अत्याचाराविरुद्ध सातत्याने लढा दिला आहे. त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून समितीच्या वतीने हा पुरस्कार बहाल करण्यात येणार आहे. या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या महोत्सवाचे नेतृत्व अध्यक्षा कमलताई हिंगोले, सचिव आशाताई तिरपुडे, खजिनदार अर्चनाताई पराग मेंढे, आयोजक केतनभाऊ आण्णासाहेब रोकडे, संकल्पना अशोकजी लक्ष्मण भोसले, तर संयोजक पराग मेंढे व जगदीश गायकवाड हे करत आहेत.







