
The Great Indian Kapil Show : बॉलिवूडची सदाबहार सुंदरी रेखा यांनी नुकतीच ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये हजेरी लावली होती. या मंचावर रेखा यांची एंट्री होताच सगळं माहोल बदलून गेला. वयाच्या ७० व्या वर्षीही आपल्या सौंदर्याने भल्याभल्यांना घायाळ करणाऱ्या रेखा यांनी या कार्यक्रमात अनेक किस्से शेअर केले. यावेळी रेखा यांनी कपिल शर्माच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आणि गाणी गाण्यापासून ते नृत्यापर्यंत आपल्या अदा दाखवून चाहत्यांची मने जिंकली. यावेळी देखील त्यांनी अमिताभ बच्चन यांची आठवण काढली. अमिताभ बच्चन होस्ट करत असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ या रिअॅलिटी शोचा प्रत्येक एपिसोड त्या कशा आतुरतेने बघतात आणि त्यातला प्रत्येक संवाद कसा लक्षात ठेवते हे सांगितले.







