
Happy Birthday Reena Roy: आपल्या दमदार अभिनयाने मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री रीना रॉय यांचा आज (७ जानेवारी) वाढदिवस आहे.७ जानेवारी१९७५ रोजी जन्मलेल्या रीना यांचे वैयक्तिक आयुष्य एखाद्या फिल्मी कथेसारखेच होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रीना रॉय यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्याला लहानपणी क्लबमध्ये काम करायच्या. मात्र, रीना यांचे हेच काम त्यांना पुढे उपयोगी पडले. रीना रॉय यांनी १९७२मध्ये ‘जरूरत’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र, त्यांना खरी ओळख१९७६मध्ये आलेल्या’कालीचरण’ या चित्रपटातून मिळाली. या चित्रपटात रीना रॉय शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत मुख्य भूमिकेत झळकल्या होत्या.






