Reasi Terrorists Attack | जम्मूत यात्रेकरुंच्या बसवरील हल्ल्यामागे विदेशी दहशतवाद्यांचा समावेश, सुरक्षा दलाने जाहीर केला दोघांचा PHOTO | Navarashtra (नवराष्ट्र)

0
20
Reasi Terrorists Attack | जम्मूत यात्रेकरुंच्या बसवरील हल्ल्यामागे विदेशी दहशतवाद्यांचा समावेश, सुरक्षा दलाने जाहीर केला दोघांचा PHOTO | Navarashtra (नवराष्ट्र)


जम्मूत यात्रेकरुंच्या बसवरील हल्ल्यामागे विदेशी दहशतवाद्यांचा समावेश, सुरक्षा दलाने जाहीर केला दोघांचा PHOTO

Terrorist attack on devotees : जम्मू काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर झालेल्या हल्ल्यात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला तर इतर 41 जण जखमी आहेत. या घटनेतील हल्लेखोर हे विदेशी असल्याचं स्पष्ट झालं असून या दोघांचं छायाचित्र सुरक्षा दलाने जाहीर केलं आहे.

Reasi Terror Attack News Marathi : जम्मू-काश्मीरमधील रियासीमध्ये रविवारी (10 जून) संध्याकाळी ६.१५ वाजता भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये ड्रायव्हर आणि कंडक्टरसह 10 जणांचा मृत्यू झाला, तर 41 जण जखमी झाले. दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्याच्या एक तास आधी हा हल्ला झाला. दरम्यान हा हल्ला होण्यापूर्वीचा एक व्हिडीओ समोर आला. तसेच जम्मू-काश्मीरमधील रियासी येथे भाविकांच्या बसवर गोळीबार करणारे दहशतवादी हे विदेशी असल्याचं स्पष्ट झालं असून अबू हमजा आणि अधुन अशी त्यांची नावं आहेत. या दोघांचं छायाचित्र सुरक्षा दलाने जाहीर केलं आहे.






Source link