Reasi bus attack | भारत हल्ला करू शकतो…, जम्मू दहशतवादी हल्ल्यानंतर पाकचे माजी पंतप्रधानाचा पाकिस्तानी सरकारला सतर्कतेचा इशारा | Navarashtra (नवराष्ट्र)

0
16
Reasi bus attack | भारत हल्ला करू शकतो…, जम्मू दहशतवादी हल्ल्यानंतर पाकचे माजी पंतप्रधानाचा पाकिस्तानी सरकारला सतर्कतेचा इशारा | Navarashtra (नवराष्ट्र)


भारत हल्ला करू शकतो…, जम्मू दहशतवादी हल्ल्यानंतर पाकचे माजी पंतप्रधानाचा पाकिस्तानी सरकारला सतर्कतेचा इशारा

जम्मू काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर झालेल्या हल्ल्यात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला तर इतर 41 जण जखमी आहेत. या घटनेनंतर पाकचे माजी पंतप्रधानाचा पाकिस्तानी सरकारला सतर्कतेचा इशारा दिला आहे.

जम्मू-काश्मीरमधील रियासीमध्ये रविवारी (10 जून) संध्याकाळी ६.१५ वाजता भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये ड्रायव्हर आणि कंडक्टरसह 10 जणांचा मृत्यू झाला, तर 41 जण जखमी झाले. दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्याच्या एक तास आधी हा हल्ला झाला. जम्मूच्या रियासी जिल्ह्यात रविवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रतिउत्तर म्हणून भारत लष्करी कधी ही हल्ला करु शकतात, पाकव्याप्त काश्मीरचे पंतप्रधान राजा मोहम्मद फारुख हैदर खान यांना भारताच्या हल्ल्याची भीती वाटत आहे.

अशा परिस्थितीत त्यांनी पाकिस्तानी लष्कर आणि शाहबाज शरीफ यांच्या सरकारला सतर्क राहण्यास सांगितले आहे. राजा हैदर यांनी सोमवारी रात्री ट्विटरवर एका पोस्टमध्ये लिहिले की, भारत रियासी हल्ल्याच्या निमित्ताने काश्मीरमध्ये कारवाई करू शकतो. भारताच्या कोणत्याही कारवाईसाठी पाकिस्तानने पूर्णपणे तयार असले पाहिजे.






Source link