
Entertainment Live News Today, 13 April 2025: सध्या बॉक्स ऑफिसवर दाक्षिणात्य चित्रपट ‘गुड बॅड अग्ली’ धुमाकूळ घालताना दिसत आहे. हिंदी, तमिळ, तेलुगु या तीन भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात अजित कुमार मुख्य भूमिकेत झळकला आहे. तसंच दुसऱ्या बाजूला सनी देओलच्या ‘जाट’ चित्रपटाच्या कमाईत हळूहळू वाढ होताना पाहायला मिळत आहे. मराठी सिनेसृष्टीत ‘अशी ही जमवा जमवी’, ‘जयभीम पँथर’, ‘पावटॉलॉजी’ हे नवे चित्रपट नुकतेच प्रदर्शित झाले आहेत. तर मालिकांमध्ये नवनवीन ट्विस्ट येत आहेत. आजच्या दिवसभरातील सिनेसृष्टी आणि मालिकाविश्वातील सर्व अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या….
Entertainment News Live Today : मनोरंजन न्यूज अपडेट
Live Updates
सनी देओलच्या ‘जाट’ चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये झाली वाढ, तिसऱ्या दिवशी केली सर्वाधिक कमाई
…अधिक वाचा
रत्नागिरीला सुके मासे खाल्ले अन् माझं ब्लड प्रेशर…; अशोक सराफांनी ‘फिटनेस’वर केलं भाष्य; म्हणाले, “त्या दिवसापासून…”
…अधिक वाचा
हँडसम हिरोशी लग्न का नाही केलं? करण जोहरच्या प्रश्नावर माधुरी दीक्षितने दिलेलं ‘हे’ उत्तर; लाजत म्हणालेली, “माझा नवरा…”
…सविस्तर बातमी
सनी देओलच्या ‘जाट’ चित्रपटाचे दुसऱ्या दिवशी ४०० शो केले रद्द
सनी देओलचा ‘जाट’ चित्रपट १० एप्रिलला प्रदर्शित झाला. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर संथ गतीने सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी सनीच्या ‘जाट’ चित्रपटाने ९.५ कोटींची कमाई केली. पण, दुसर्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत घसरण झाली. शुक्रवारी ११ एप्रिलला ‘जाट’ चित्रपटाने फक्त ७ कोटींचा गल्ला जमवला. माहितीनुसार, मुंबईतील ‘जाट’ चित्रपटाचे १०० आणि दिल्ली-एनसीआरमधील ३० असे ४०० हून अधिक शो रद्द केले. याचाच परिणाम ‘जाट’ चित्रपटाच्या दुसऱ्या दिवशीच्या कमाईवर झाल्याचं म्हटलं जात आहे.
अजित कुमारच्या ‘गुड बॅड अग्ली’ चित्रपटाचा प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद, आतापर्यंत केली ‘इतक्या’ कोटींची कमाई
सुपरस्टार अजित कुमारच्या २०२५ मधील बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘गुड बॅड अग्ली’. या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ पाहायला मिळत आहे. १० एप्रिलला प्रदर्शित झालेला ‘गुड बॅड अग्ली’ चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत ५० कोटींचा आकडा पार केला आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, पहिल्या दिवशी अजित कुमारच्या चित्रपटाने २९.२५ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कमाई किंचित घट झाली. १५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. पण तिसऱ्या दिवशी ‘गुड बॅड अग्ली’ चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली. प्रदर्शनानंतरच्या पहिल्या शनिवारी या चित्रपटाने १८.५० कोटींचं कलेक्शन केलं. तीन दिवसांत ‘गुड बॅड अग्ली’ चित्रपटाने एकूण ६२.७५ कोटींची कमाई केली. ज्यामुळे अजित कुमारचा हा चित्रपट ५० कोटींच्या क्लबमध्ये सहज सामील झाला आहे.
‘गुड बॅड अग्ली’ चित्रपटाचं पोस्टर ( फोटो सौजन्य – ग्राफिक्स टीम )







