RBI Action  |  ‘या’ दोन बॅंकावर आरबीआयची मोठी कारवाई, नेमकं प्रकरण काय? तुमचे खाते तर नाही ना? | Navarashtra (नवराष्ट्र)

0
54
RBI Action  |  ‘या’ दोन बॅंकावर आरबीआयची मोठी कारवाई, नेमकं प्रकरण काय? तुमचे खाते तर नाही ना? | Navarashtra (नवराष्ट्र)


 ‘या’ दोन बॅंकावर आरबीआयची मोठी कारवाई, नेमकं प्रकरण काय? तुमचे खाते तर नाही ना?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) अॅक्शन मोडमध्ये आली असून सेंट्रल बँकेच्या निर्देशांचे पालन न करणाऱ्या बँकांवर विशेष कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. नुकतीच कारवाई करण्यात आलेल्या बड्या दोन खासगी बॅंका आहेत. तुमचे खाते तर नाही या बॅंकेत?

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) आता ॲक्शनमोड मध्ये आली असून ज्या बँकांनी सेंट्रल बँकच्या सूचनेचे पालन केले नाही त्या बँकेवर कारवाई करायला सुरवात केली आहे. आरबीआयला असलेल्या अधिकारांचा वापर करत आरबीआयने त्या बँकांवर दंडसुद्धा ठोठावला आहे.
तुमचे खाते या बॅंकेत असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

रिझर्व्ह बँकेने खासगी क्षेत्रातील दोन मोठ्या बँकांवर कडक कारवाई केली असून आरबीआयने येस बँक ( YES Bank) आणि आयसीआयसीआय (ICICI) बँकेवर कारवाई करत कोटींचा दंड ठोठावला आहे. बँकिंग नियामानुसार, येस बँक आणि आयसीआयसीआय बँक मध्यवर्ती बँकेच्या अनेक नियमांचे उल्लंघन करत आहेत. यामुळे येस बँकेला ९१ लाख रुपये आणि
आयसीआयसीआय बँकेला १ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.






Source link