Ravindra Mahajani : बाबा माझी टेनिस रॅकेट घेऊन आईवर…; गश्मीर महाजनीने सांगितली बालपणीची हृदयद्रावक आठवण

0
17
Ravindra Mahajani : बाबा माझी टेनिस रॅकेट घेऊन आईवर…; गश्मीर महाजनीने सांगितली बालपणीची हृदयद्रावक आठवण


“टेनिस प्रॅक्टिस संपवून १० वर्षांचा मी संध्याकाळी घरी परतलो. लिव्हिंग रुममधील टेबलवर माझे चीज सँडविच आणि दुधाचा ग्लास ठेवला होता. कोचवर काळा चष्मा लावून बाबा बसले होते आणि वर बेडरूमकडे जाणाऱ्या जिन्यावर आई उभी होती. मी येण्याआधी त्यांच्यात जे काही सुरू होते ते मी येताच जणू टाइम प्लीज घेतल्यासारखे थांबले. कोचवर बाबांशेजारी बसून मी खायला सुरुवात केली तेव्हा आई हळू आवाजात म्हणाली, ‘गशू, पोलिसांना फोन लाव रे’ यानंतर बाबा माझी टेनिस रॅकेट घेऊन तिच्यावर धावून गेले. आई बेडरूमकडे धावली, बेडरूमच्या दारावर रॅकेट बडवण्याचा आवाज घरभर घुमू लागला. घरातील कुत्री भुंकू लागली आणि मी बसल्याजागी भोकाड पसरले. थोड्यावेळाने बाबा शांत होऊन खाली उतरले, माझी रॅकेट कोचवर ठेवली आणि ‘काही नाही झाले तुझ्या आईला’, असे म्हणत निघून गेले. त्या काळात असे प्रसंग आमच्या घरात वारंवार होत. फक्त कधी दार बडवले जायचे, तर कधी आई एवढाच काय तो फरक” असे गश्मीर म्हणाला.



Source link