Rashmika Mandanna: गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू अन् साडी; रश्मिका मंदानाचा ‘अ‍ॅनिमल’ लूक पाहिलात?

0
12
Rashmika Mandanna: गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू अन् साडी; रश्मिका मंदानाचा ‘अ‍ॅनिमल’ लूक पाहिलात?


अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने तिच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ‘अ‍ॅनिमल’मधील तिच्या लूकची झलक दाखवली आहे. रश्मिकाने तिच्या या ट्विटमध्ये फोटो शेअर करत लिहिले की, ‘गीतांजलीला भेटा’. रश्मिकाने ‘अ‍ॅनिमल’मधील तिच्या व्यक्तिरेखेचे नाव काय असणार आहे, याचीही माहितीही चाहत्यांना दिली आहे. या पोस्टरमध्ये, लाल आणि पांढर्‍या कॉम्बिनेशनच्या या साडीमध्ये रश्मिका मंदाना आपल्या साधेपणाने सर्वांची मनं जिंकत आहे. अभिनेत्री रश्मिका मंदानाचा ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटातील लूक सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे. दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचा टीझर २८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता प्रदर्शित होणार आहे.



Source link