Rashid Khan Hospitalized: कर्करोगाशी झुंज; प्रसिद्ध गायक राशिद खान यांची प्रकृती चिंताजनक!

0
10
Rashid Khan Hospitalized: कर्करोगाशी झुंज; प्रसिद्ध गायक राशिद खान यांची प्रकृती चिंताजनक!


Rashid Khan Hospitalized: प्रसिद्ध शास्त्रीय गायक राशिद खान यांना शनिवारी (२३ डिसेंबर) कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वयाच्या ५५व्या वर्षी ते कर्करोगाशी झुंज देत असून, त्यांची प्रकृती खालावली आहे. रामपूर-सहस्वान घराण्याचे प्रसिद्ध गायक राशिद खान मागील बऱ्याच काळापासून प्रोस्टेट कर्करोगाने ग्रस्त आहेत. या दरम्यान, टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, नंतर त्यांनी कोलकात्यातच उपचार सुरू ठेवण्यास प्राधान्य दिले. त्यामुळेच त्यांना कोलकाता येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे



Source link