
काय पाहायला मिळणार शेवट?
काही महिन्यांपूर्वी मालिकेनं १४ वर्षांचा लीप घेतला होता. दीपा आणि कार्तिक यांच्या नात्यामध्ये सारंकाही बदलले होते. सध्या कार्तिक खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यातच आयेशाची एण्ट्री झाली. ती पाहून प्रेक्षकांनी तर संताप व्यक्त केला होता. कार्तिक आणि आयेशा एकत्र येऊन दीपाला त्रात देत होते. पण आयेशाची स्मृती गेल्यानंतर मात्र मालिका पुन्हा रटाळ झाली. आता मालिकेच्या शेवटी मात्र आयेशाची स्मृती परत येणार असल्याचं दाखवण्यात येणार आहे. तसेच ती तिने केलेल्या चुका मान्य करणार आहे. नंतर आता मालिकेच्या शेवटी पुन्हा एकदा कार्तिक आणि दीपाचा सुखी संसार प्रेक्षकांना पाहायला मिळणार.








