
आयेशाच्या अचानक झालेल्या एन्ट्रीमुळे आर्यनच्या कटावरून पडदा उघडला आहे. आर्यन हा आयेशाच्या बहिणीचा मुलगा असून, तो इनामदार कुटुंबावर सूड उगवण्यासाठी आला आहे. मात्र, तो आयेशाला कार्तिक आणि दीपापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे तिला होणारा त्रास कमी होईल, असे त्याला वाटत आहे. मात्र, आता आयेशा आणि दीपाची भेट होणार आहे. दोघी एकाचवेळी एकाच ठिकाणी आल्याने आता त्यांची भेट होणारच आहे. या भेटीमुळे मात्र दीपा आणि कार्तिकच्या आयुष्यात पुन्हा वादळ येणार आहे.






