
रणधीर आणि बबिता यांची पहिली भेट
रणधीर आणि बबिता यांची पहिली भेट १९६९ च्या ‘संगम’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्यांच्यातील गप्पा वाढल्या, भेटीगाठी वाढत गेल्या. त्यांचं एक टाइमपास रिलेशन होते. मात्र ही गोष्ट रणधीर यांचे वडील राज कपूर यांच्यापासून लपलेली नव्हती. एके दिवशी त्यांनी रणधीर यांना बबिता म्हातारी झाल्यावर तिच्याशी लग्न करणार आहेस का, असे विचारले. त्यानंतर त्यांनी ६ नोव्हेंबर १९७१ साली लग्न केले. त्यानंतर करिश्मा आणि करिनाचा जन्म झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ८० च्या दशकाच्या शेवटी रणधीर यांचे चित्रपट चालेनासे झाले. त्यामुळे त्यांच्यावरील तणाव वाढू लागला.








