
बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा आणि त्याची प्रेयसी लिन लैशरामने २९ नोव्हेंबर रोजी लग्नगाठ बांधली. मणिपूरमधील इंफाळ येथील मंदिरात पारंपरिक मणिपुरी पद्धतीने त्यांचा लग्नसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाला केवळ कुटुंबीयांना बोलावण्यात आलो होते. लग्नातील दोघांचेही फोटो सोशल मीडियावर चर्चेत होते. आता मुंबईत परतल्यावर रणदीपने रिसेप्शन पार्टी आयोजित केली होती. या पार्टीमधील लिनचा डान्स पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.






