
जंजिर चित्रपटापूर्वी अमिताभ बच्चनचा पडता काळ होता. त्याचा एकही चित्रपट चालत नव्हता. त्यामुळे त्याला चित्रपट मिळणे कठीण झाले होते. अनेक चित्रपटांमधून बिग बींना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. अरविंद सेन दिग्दर्शित कसौटी या चित्रपटात देखील असेच काहीसे होणार होते. मात्र रमेश देव यांनी अरविंद सेन यांना समजावले. त्यामुळे अमिताभ यांना या चित्रपटात काम मिळाले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरला होता. कसौटी चित्रपटात अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, प्राण आणि रमेश देव महत्त्वाच्या भूमिकेत होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.








