Ramdev Baba : फसव्या जाहिरातीप्रकरणी बाबा रामदेव जनतेची माफी मागणार, कोर्टानं दिला आठवडाभराचा वेळ

0
14
Ramdev Baba : फसव्या जाहिरातीप्रकरणी बाबा रामदेव जनतेची माफी मागणार, कोर्टानं दिला आठवडाभराचा वेळ


खंडपीठानं रामदेव बाबांना फटकारलं!

न्यायमूर्ती हिमा कोहली यांनी बाबा रामदेव यांना हिंदीत विचारलं, ‘तुम्ही जे काही केलं, ते तुम्ही न्यायालयाच्या विरोधात केलं. ते बरोबर आहे का?’ त्यावर उत्तर देताना रामदेव म्हणाले, ‘न्यायाधीश साहेब, झालेल्या चुकीसाठी मी बिनशर्त माफी मागतो.’ त्यावर न्यायमूर्ती हिमा कोहली यांनी रामदेव बाबांच्या वृत्तीवर बोट ठेवलं. पत्रकार परिषद घेऊन ॲलोपॅथीवर प्रश्न उपस्थित करण्याच्या रामदेव यांच्या कृतीवर त्यांनी आक्षेप व्यक्त केला. आपल्या देशात प्रत्येक जण वेगवेगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवतो. केवळ आयुर्वेदिक औषधं वापरली जातात असं नाही, असं कोहली यांनी सुनावलं.



Source link