Ramdev Baba : रामदेव बाबांना हायकोर्टचा दणका! पतंजली आयुर्वेदवर ४ कोटींचा दंड, न्यायालयाच्या आदेशाचे केले उल्लंघन भोवले

0
24
Ramdev Baba : रामदेव बाबांना हायकोर्टचा दणका! पतंजली आयुर्वेदवर ४ कोटींचा दंड, न्यायालयाच्या आदेशाचे केले उल्लंघन भोवले


न्यायमूर्ती अनुप जयराम भंभानी यांच्या खंडपीठाने निर्णय देताना सांगितले की, ‘या प्रकरणी अर्ज मंजूर करत असून मी काही मजकूर, पोस्ट काढून टाकण्यास सांगितले होते. मी बचाव पक्षाला तीन दिवसांत ते काढून टाकण्यास सांगितले आहेत न्यायमूर्ती अनुप जयराम भंभानी यांनी पक्षकारांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर २१ मे रोजी निर्णय राखून ठेवला होता. दिल्ली मेडिकल असोसिएशनने (डीएमए) दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. याचिकेत असे म्हटले होते की, रामदेव यांच्या कंपनीने कोरोनिल किटबद्दल खोटे दावे केले आणि त्याचे वर्णन कोरोना रोगावर उपचार करणारे आहे, तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे औषध म्हणून परवाना देण्यात आला होता.



Source link