
Parbhani Violence: परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आल्यानंतर बुधवारी परभणी शहर आणि जिल्ह्यात संतापाची लाट उसळली. या घटनेच्या निषेर्धात नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केली. आता या घटनेवर आरपीआय पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवलेंनी आपली प्रतिक्रिया दिली. संविधानचा अवमान आम्ही खपवून घेणार नाही. संविधानाचा अवमान करण्याऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यानंतर कोणी शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहे का? याचाही तपास करायला हवा, असेही त्यांनी म्हटले आहे.







