Ram Rahimla gets parole | बलात्कार प्रकरणाी शिक्षा भोगत असलेल्या राम रहीमला पुन्हा पॅरोल, आता 21 दिवसांसाठी तुरुंगातून बाहेर येणार | Navarashtra (नवराष्ट्र)

0
15
Ram Rahimla gets parole  | बलात्कार प्रकरणाी शिक्षा भोगत असलेल्या राम रहीमला पुन्हा पॅरोल, आता 21 दिवसांसाठी तुरुंगातून बाहेर येणार | Navarashtra (नवराष्ट्र)


बलात्कार प्रकरणाी शिक्षा भोगत असलेल्या राम रहीमला पुन्हा पॅरोल, आता 21 दिवसांसाठी तुरुंगातून बाहेर येणार

डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीम बलात्कार प्रकरणी दोषी ठरल्यानतंर पुन्हा एकदा तुरुंगातून बाहेर येणार आहे. यावेळी त्याला 21 दिवसांचा पॅरोल मिळाला आहे.

बलात्कार प्रकरणी गेल्या अनेक दिवसापासून हरियाणाच्या रोहतक तुरुंगवास भोगत असलेले डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम (Ram Rahimla gets parole ) आता पुन्हा एकदा तुरुंगातून बाहेर येणार आहे. दोषी ठरल्यानंतर राम रहीमची पाचव्यांदा तुरुंगातून सुटका होणार आहे.राम रहीमला २१ दिवसांचा पॅरोल मिळाला आहे.राम रहीम उत्तर प्रदेशातील बागपत येथील बर्नवा आश्रमात २१ दिवस राहणार आहे. पॅरोल मिळाल्यानंतर त्यांच्या अनुयायांमध्ये आनंदाची लाट उसळली असून आश्रमात त्यांच्या आगमनाची तयारीही सुरू झाली होती.

हे सुद्धा वाचा

मात्र, राम रहीमच्या तुरुंगातून बाहेर येणामुळे नव्या चर्चांना पेव फुटले आहे. या प्रकाराला पुढील वर्षी हरियाणामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीशीही जोडले जात आहे. डेरा सच्चा सौदा आश्रमाचे प्रवक्ते जितेंद्र खुराना यांनी सांगितले की, त्यांना 21 दिवसांची पॅरोल मंजूर झाल्याचीही माहिती माध्यमांकडून मिळाली आहे.






Source link