
Ayodhya Temple News: येत्या २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. यासाठी व्हीव्हीआयपी लोकांना निमंत्रण पत्रे पाठवली जात आहेत. मंगळवारी राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले. याशिवाय, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनाही निमंत्रित करण्यात आले. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नाहीत.







