Ram Mandir Inauguration | 22 जानेवारीला केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार ‘हाफ डे’; दुपारी अडीचपर्यंत सुट्टी, सरकारचा निर्णय! | Navarashtra (नवराष्ट्र)

0
17
Ram Mandir Inauguration  | 22 जानेवारीला केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार ‘हाफ डे’; दुपारी अडीचपर्यंत सुट्टी, सरकारचा निर्णय! | Navarashtra (नवराष्ट्र)


22 जानेवारीला केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार ‘हाफ डे’; दुपारी अडीचपर्यंत सुट्टी, सरकारचा निर्णय!

22 जानेवारीला देशभरात राम मंदिराचा उद्घाटन सोहळा मोठ्या प्रमाणावर पाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे 22 जानेवारीला मध्यवर्ती कार्यालयांना अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

अयोध्येत येत्या रविवारी (22 जानेवारी) राम मंदिर उद्घाटन (Ram Mandir Inauguration ) समारंभ पार पडणार आहे. नुकतचं रामलल्लाची मुर्ती मंदिरातील गर्भगृहेत आणण्यात आली असून येत्या रविवारी मंत्रोच्चारात मुर्तीचा अभिषेक होणार आहे. राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी अयोध्येत जय्यत तयारी करण्यात आली असून देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. रामभक्तांमध्येही मोठा उत्साह पाहण्यात येत आहे. जागोजागी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यता आलं आहे. या पार्श्वभुमीवर 22 जानेवारीला केंद्रीय कर्मचाऱ्यांना हाफ डे देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

 22 जानेवारीला मुख्य कार्यक्रम

येत्या 22 जानेवारीला अयोध्येत मंदिरात प्रभु श्रीरामांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. रविवारी रामल्लाचा अभिषेक पार पडल्यानंतर राम मंदिरात प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला सुरुवात होणार आहे. अशातच या सोहळ्यानिमित्त केंद्र सरकारनं केंद्रीय कार्यालय आणि संस्थांना दुपारी अडीच वाजेपर्यंत ‘हाफ डे’ ची घोषणा केली आहे. 22 जानेवारीला देशभरात राम मंदिराचा उद्घाटन सोहळा मोठ्या प्रमाणावर पाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे 22 जानेवारीला मध्यवर्ती कार्यालयांना अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या अधिसूचनेत सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचाही समावेश आहे. दरम्यान, केंद्राच्या या घोषणेनंतर अशी चर्चा सुरू आहे की, 22 जानेवारीला रामललाचा अभिषेक सोहळा थेट पाहण्याचा मोठा विक्रम देशात होऊ शकतो.





Source link