Ram Kapoor Birthday: ऑनस्क्रीन वहिनीच्याच प्रेमात पडलेला अभिनेता राम कपूर! भन्नाट लव्हस्टोरी माहितीये का?

0
51
Ram Kapoor Birthday: ऑनस्क्रीन वहिनीच्याच प्रेमात पडलेला अभिनेता राम कपूर! भन्नाट लव्हस्टोरी माहितीये का?


अभिनेत्री गौतमी गाडगीळ आणि अभिनेता राम कपूर यांनी ‘घर एक मंदिर’ या टीव्ही मालिकेत एकत्र काम केले होते. या मालिकेच्या शूटिंग दरम्यान दोघे मनाने एकमेकांच्या जवळ आले होते. हळूहळू राम कपूर गौतमीच्या प्रेमात पडला. यांच्या रिअल लाईफ प्रेमकहाणीमुळे त्यांच्या मालिकेत देखील मोठा ट्वीस्ट आला होता. ‘घर एक मंदिर’ या टीव्ही सीरियलमध्ये गौतमी पहिल्यांदा राम कपूरच्या वहिनीच्या भूमिकेत दिसली होती. पण, नंतर शोमध्ये असा ट्विस्ट आणि टर्न आला की, गौतमी वहिनी नव्हे तर, त्याची पत्नी बनली. मालिकेतील त्यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. यानंतर ते एकमेकांच्या खूप जवळ आले.



Source link