
राखीला हे कृत्य करताना पाहून अनेक यूजर्सचा संयम सुटला आहे. एका व्यक्तीने कमेंट करत म्हटले की, ‘ती आता पैशांचा पाऊस पाडत आहे. एकवेळ अशी होती जेव्हा आईच्या उपचारासाठी पैसे हवे म्हणून रडत होती आणि अंबानींकडे मदत करण्याची विनंती करत होती.’ दुसर्याने लिहिले, ‘हे आरबीआयच्या नियमाविरुद्ध आहे, बँकिंग नियमन कायदा, १९४९च्या कलम ३५ए नुसार तुम्ही असे करू शकत नाही.’ ‘असे कृत्य केल्याबद्दल राखीला तुरुंगात पाठवा’, असेही एका यूजरने म्हटले आहे.








