
Fraud With Rakesh Bedi: टीव्ही मालिका आणि चित्रपट अभिनेते राकेश बेदी नुकतेच फसवणुकीचे शिकार ठरले आहेत. ‘गदर २’ फेम अभिनेत्याला तब्बल ७५ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणाची तक्रार आता अभिनेत्याने पोलिसांकडे केली आहे. या प्रकरणी सदर भामट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका मुलाखतीत या भामट्या व्यक्तीने आपण लष्करी अधिकारी असल्याचे भासवून अभिनेते राकेश बेदी यांच्याकडून हजारो रुपये उकळले आहेत. आपल्यासोबत हा प्रकार नेमका कसा घडला, याची माहिती अभिनेत्याने नुकतीच दिली आहे.








