Rajya Sabha election : राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेलांना पुन्हा राज्यसभेवर संधी, राजीनामा देऊन पुन्हा भरणार अर्ज

0
21
Rajya Sabha election : राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेलांना पुन्हा राज्यसभेवर संधी, राजीनामा देऊन पुन्हा भरणार अर्ज

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील ६ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यातील तीन जागांवर भाजपने उमेदवार दिले आहे. त्यानंतर शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीकडून प्रत्येकी १-१ जागेवर उमेदवार जाहीर केले आहेत. भाजप, शिवसेना व काँग्रेसकडून आपले उमेदवार जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीकडून कोणाला संधी मिळणार यांची उत्सुकता होती. राष्ट्रवादीकडून पार्थ पवार, बाबा सिद्धीकी यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र अखेर प्रफुल्ल पटेलांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.

Source link