
त्यानंतर शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात रजनी सातव यांना १९८६ मध्ये आरोग्य वैद्यकीय शिक्षण समाज कल्याण आदिवासी विकास राज्यमंत्री पद देण्यात आलं होतं. तसेच १९८८ मध्ये शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, समाज कल्याण राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती. १९९३ ते १९९९ या काळात त्यांनी दोन वेळा विधानपरिषद सदस्य म्हणूनही काम केलं.







