
दोन लोकांना अटक
‘गेम झोन’मध्ये आगीसंबंधीचे ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी)ही नसल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अग्निसुरक्षा उपकरणे आहेत पण आग आटोक्यात आणण्यासाठी केलेली कारवाई पुरेशी नव्हती, त्यामुळे शनिवारी ही दुर्घटना घडली. राजकोटचे पोलिस उपायुक्त (गुन्हे) पार्थराजसिंग गोहिल यांनी सांगितले की, टीआरपी गेम झोनचे संचालन करणाऱ्या रेसवे एंटरप्रायझेसचा भागीदार युवराज सिंग सोलंकी आणि त्याचे व्यवस्थापक नितीन जैन यांना अटक करण्यात आली आहे.







