
राजेश खन्ना यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले. परंतु, काही काळानंतर त्यांच्या स्टारडमलाही उतरती कळा लागली होती. त्यांची लोकप्रियता कमी होत चालली होती. असे म्हटले जाते की, अमिताभ बच्चन यांनी जेव्हा फिल्मी दुनियेत प्रवेश केला, तेव्हा राजेश खन्ना नावाची जादू लोकांमधून ओसरू लागली. या मागचं मुख्य कारण होतं कारण होतं अॅक्शनपट… अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत अॅक्शनपटांची रांगच लावायला सुरुवात केली होती. तर, दुसरीकडे राजेश खन्ना यांची इमेज रोमँटिक हिरो अशीच बनून राहिली होती. यातून बाहेर पडणं त्यांच्यासाठी कठीण झालं होतं.







