Rajdhani Express : राजधानी एक्स्प्रेसमध्ये तुफान गोळीबार; आरोपीला अटक, तपास सुरू

0
22
Rajdhani Express : राजधानी एक्स्प्रेसमध्ये तुफान गोळीबार; आरोपीला अटक, तपास सुरू


मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडच्या धनबाद स्टेशनवरून निघालेल्या सियालदह-राजधानी एक्सप्रेसमध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी आरोपी हरविंदर सिंग नामक व्यक्ती ट्रेनमध्ये चढला. परंतु तिकीटवरून टीसी सोबत त्याचे वाद झाले. त्यामुळं संतापलेल्या हरविंदर सिंगने थेट ट्रेनमध्येच गोळीबार करायला सुरुवात केली. यावेळी बंदुकीचा आवाज ऐकताच प्रवाशांची चांगलीच धावपळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित आरोपीला ताब्यात घेतलं. आरोपीला कोडरमा स्टेशनवर उतरवण्यात आलं असून तो दारु पिलेला होता की नाही, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.



Source link