
राजस्थानमध्ये वसुंधरा राजे यांचे युग संपले आहे. राज्याची सुत्रे आता भजनलाल शर्मा यांच्याकडे सोपवली आहेत.मध्य प्रदेश आणि छत्तीसगडप्रमाणे राजस्थानमध्येही भाजपने सर्वांना धक्का देत नव्या चेहऱ्याला मुख्यमंत्रीपदी बसवले आहे. भजनलाल शर्मा पहिल्यांदाच आमदार बनले असून थेट मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचले आहेत. त्यांनी जयपूर येथील सांगानेर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. भरतपूर येथे राहणारे भजनलाल शर्मा भलेही पहिल्यांदाच आमदार झाले असतील मात्र राजस्थान भाजपमधील दिग्गज नेते आहेत. त्यांना अमित शहा यांच्या जवळचे मानले जाते. छत्तीसगडमध्ये आदिवासी आणि मध्य प्रदेशमध्ये ओबीसी नेत्याला मुख्यमंत्री बनवल्यानंतर भाजपने राजस्थानमध्ये आता ब्राह्मण नेत्याला राज्याच्या प्रमुखपदी बसवले आहे. अशा प्रकारे भाजपने सर्व वर्गाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.






