
दौसा जिल्ह्यात गुरुवारी रात्री झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. या अपघातात आठ जण जखमी झाले असून त्यापैकी सहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
राजस्थानमधून एक मोठी दुर्घटना घडल्याचं समोर येत आहे. राजस्थानातील दौसा जिल्ह्यात एक मोठ अपघात झाला आहे. महुआ पोलीस स्टेशन परिसरात गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता एक ओला टॅक्सी चालक जयपूरहून त्याच्या गावासाठी जाण्यासाठी निघाला होता. महुआ येथे पोहोचताच अचानक रस्त्याच्या कडेला झोपलेल्या लोकांना धडक (Rajasthan Accident News) दिली, त्यामुळे 11 जण जखमी झाले. या अपघाता डत रुग्णालयातच उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला.
हे सुद्धा वाचा
महुआ पोलिस स्टेशनचे अधिकारी जितेंद्र सिंह सोलंकी यांनी सांगितले की, टॅक्सी चालक दौलतरामचा मुलगा रामजीत हा वेगात गाडी चालवत असताना रात्री उशिरा टिकाराम पालीवाल शाळेजवळ हा अपघात झाला. त्यामुळे अचानक गाडीचे नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या कडेला झोपडपट्टीसमोर झोपलेल्या लोकांवर आदळल्याने 11 जण जखमी झाले. त्या वेळी ओला टॅक्सी चालक दारूच्या नशेत होता, त्यामुळे वळण घेत असताना भरधाव वेगात गाडी चालवताना त्याला वाहनावर नियंत्रण ठेवता आले नाही, असे सांगण्यात येत आहे.










