
शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी २००७ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनाची स्थापना केली. सुरुवातीच्या काळातच राज यांनी मराठीच्या मुद्द्यावरुन रान पेटवले. दरम्यान, राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसे यांनी २००८ मध्ये रेल्वे भरतीमध्ये मराठी मुलांना प्राधान्य देण्याच्या मुद्द्यावरुन आंदोनल उभारले. त्यावेळी सांगलीतील शिराळा येथे मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. परंतु, या आंदोलनाला हिंसक वळण लागले. यानंतर राज ठाकरे यांच्याविरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला. तब्बल १६ वर्षांपासून राज ठाकरे यांच्याविरोधात इस्लामपूर न्यायलयात खटला सुरू होता. याप्रकरणी इस्लामपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता केली. मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी याबाबत माहिती दिली.







