
पुण्यात आलेल्या पुरावरून सरकारवर निशाणा साधताना राज ठाकरे म्हणाले, एक उपमुख्यमंत्री पुण्याचे आहेत, पण ते नसतानाही धरणं वाहिली. मुळा-मुठा नदीत अनधिकृत बांधकामे झालीत.पुण्यात काही दिवसांपूर्वी जो पाऊस झाला त्यावेळेस धरणातून पाणी सोडलं गेलं. हे पाणी सोडलं जाणार आहे याची लोकांना कल्पना नव्हती असं मी म्हणणार नाही,पण ते नक्की किती सोडलं जाणार आहे, कधी सोडलं जाणार आहे,याबाबत अनभिज्ञता होती. त्यामुळे लोकांचं अपरिमित नुकसान झालं आहे. आज घरांचं, गाड्यांचं नुकसान झालं आहे, त्याची भरपाई कशी होणार असा लोकांना प्रश्न पडला आहे. अनेकांच्याकडे या नुकसान भरपाईसाठी इन्श्युरन्स देखील नाहीये. आणि ज्यांच्याकडे आहे त्यांना इन्शुरन्स कंपन्यांनी नैसर्गिक आपत्तीचे कारण देत भरपाई देण्यास टाळाटाळ सुरु केली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने त्यांना भरपाई द्यायला हवी.







