
Mumbai News: मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या अपघातात मोठी वाढ झाली. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवर गेल्या चार महिन्यात (जानेवारी ते एप्रिलपर्यंत) ७८९ जणांच्या मृत्युची नोंद झाली. यातील २४४ जणांचा मृत्यू रुळ ओलांडताना झालेल्या रेल्वे अपघातामुळे झाला. १३६ जणांचा प्रवास डब्ब्यातून खाली पडल्याने आणि दोन जणांचा रेल्वेच्या खांबावर आदळल्याने मृत्यू झाला. तीन प्रवाशांचा प्लेटफॉर्ट आणि ट्रेनमधून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर, एकाचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाला. याशिवाय, ३९ जणांनी रेल्वे समोर उडी घेत आत्महत्या केली. तर, २१९ जणांचा नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू झाला आणि १५ जणांचा इतर कारणांमुळे झाला. ११० लोकांचे मृतदेह बेवारस होते.





