Raigad news : वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून ३२ लाखांची फसवणूक, टोळी गजाआड

0
13
Raigad news : वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश  मिळवून देण्याचे आमिष दाखवून ३२ लाखांची फसवणूक, टोळी गजाआड


अलिबाग येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो, असे आमिष दाखवून ३२ लाख ५० हजार रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे. कोल्‍हापूर येथील अभिजीत वानिरे यांच्‍या मुलीला अलिबागच्‍या मेडीकल कॉलेजमध्‍ये एमबीबीएसला ॲडमिशन मिळवून देतो असे सांगून या टोळक्‍याने त्यांच्याकडून ३२ लाख ५० हजार रूपये उकळले होते. या टोळीतील चार जणांना रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानेअडक केली आहे. सौरभ दास, सोमेन मन्‍ना, सोमेश बिरा आणि अभिषेक कुमार रज्‍जाक अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहे.



Source link