
लोकसभा निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होणार आहेत. एप्रिल आणि मे महिन्यात देशभरात मतदान होणार असल्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग काही दिवसांत तारखा जाहीर करण्याची शक्यता आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि विरोधी पक्ष इंडिया अलायन्स यांच्यात मुख्य लढत होणार आहे. भाजपचा दावा आहे की यावेळी त्यांचा पक्ष ३७० जागा आणि एनडीए ४०० जागा जिंकणार आहे तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी आघाडीने आपल्या विजयाचा दावा केला आहे. गेल्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ११ एप्रिल ते १९ मे या कालावधीत एकूण सात टप्प्यांत मतदान झाले आणि २३ मे रोजी निकाल जाहीर झाला








