
दिग्दर्शक सचिन कांबळे यांनी आतापर्यंत ‘आपली यारी’, ‘मी नादखुळा’, ‘आपलीच हवा’, ‘चिंतामणी माझा’, ‘माझी ताई’ अशा ५०हून अधिक म्युझिक अल्बमचं दिग्दर्शन केलं आहे. काही गाण्यांची कोरिओग्राफी सुद्धा त्यांनी केली आहे. सई आणि कार्तिकेय हे दोघेही ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाज’ या रिॲलिटी शोमध्ये एकमेकांचे स्पर्धक जरी असले, तरी त्यांची छान मैत्री होती. ‘रागिनी’ गाण्यात देखील त्यांची रिअल बॉंडींग चांगल्याप्रकारे दिसून आली आहे. ‘रागिनी’ हे गाणं आरती पाठक हिने लिहीले असून, गायक मधूर शिंदे आणि गायिका अंशिका चोणकर यांनी गायले आहे. या गाण्याला सोशल मीडियावर खूप चांगला प्रतिसाद मिळतोय.








