
पुण्यात १८ जण झिका बाधित आढळले आहेत. प्रामुख्याने एरंडवणे परिसरात हे रुग्ण सापडले आहेत. एकूण रुग्णांपैकी ६ रुग्ण हे एरंडवणे परिसरातील आहे. तर त्यानंतर पाषाण व खराडी येथे देखील ३ रुग्ण आढळले आहेत. तर मुंढवा येथे २ रुग्ण. तर डहाणूकर कॉलनी, उजवी भुसारी कॉलनी, आंबेगाव बुद्रुक आणि कळस येथे प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे. या ठिकाणी आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाय योजना सुरू केल्या आहेत. साठलेले पाण्याचे साठे नष्ट केले जात आहे. तर आता पर्यंत डासोत्पत्तीचे अनेक स्थाने आढळले असून तआतापर्यंत ३३३ घरमालकांना नोटीस पाठवण्यात आली आहे. तर त्यांच्याकडून १ लाख ८८ हजार ६०० रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला आहे.







