
Pune warje firing : पुण्यात खून, दरोडे, चोऱ्या, गोळीबाराच्या घटना वाढल्या आहेत. दोन खून होण्याची घटना ताजी असतांना मंगळवारी बारामती लोकसभा मतदार संघाचे मतदान संपल्यावर वारजे माळवाडी येथील रामनगर भागात दुचाकीवरून आलेल्या तिघांनी हवेत गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे या परसरात दहशतीचे वातावरण आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.





