Pune Traffic Update : पुणेकरांनो, घराबाहेर पडण्याआधी हे वाचा! मेट्रोच्या कामासाठी गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत मोठा बदल

0
17
Pune Traffic Update : पुणेकरांनो, घराबाहेर पडण्याआधी हे वाचा! मेट्रोच्या कामासाठी गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत मोठा बदल


Pune Traffic Update : पुण्यात मेट्रोची कामे वेगाने सुरू आहेत. हिंजवडी – शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेवरील पाच मेट्रो स्थानकांच्या कामासाठी गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. वाहतूक विभागाने येथील कामे लवकर करण्यासाठी औंध, गणेश खिंड आणि शिवाजी नगर मार्गावर वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. या बादलानुसार सर्व प्रकारची मालवाहतूक, खासगी प्रवासी बसेस, पीएमपीएल बसेसला ब्रेमेन चौकातून डावीकडे वळून डॉ. आंबेडकर चौकातून जावे लागेल. तर, दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांना एबिल हाऊस येथून डावीकडे वळून रेंजहिल्स मार्गे जावे लागणार आहे.



Source link