Pune RTO action : पीएमपीच्या वाहनांना अडथळा; पुण्यात १,६२० रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा

0
15
Pune RTO action : पीएमपीच्या वाहनांना अडथळा; पुण्यात १,६२० रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा


Pune RTO action : पुण्यात बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात पीएमपी प्रशासन आणि पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने मोहीम उघडली असून पीएमपीचालकांना अडथळा ठरणाऱ्या व बसस्थानक, थांब्याच्या ठिकाणी येऊन बस प्रवासांची वाहतुकीत अडथळा ठरणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यात १ हजार ६२० रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. या सोबतच ओला, उबेर, आणि खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या ५३९ वाहनांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांचकडून ३ लाख ३२ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.



Source link