
पुणे: पुण्यात गेल्या आठवड्यापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सकाळी ढगाळ वातावरण तर दुपारी तीव्र ते अतितीव्र पावसाच्या सरी बरसत आहे. वीजांच्या कडकडाटात होणाऱ्या या पावसामुळे काही वेळातच पुण्यातील रस्ते पाण्याने तुंबत आहे. दरम्यान, या पावामुळे पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण साखळीत वाढ झाली आहे. पुण्यावर मोठ्या उंचीचे ढग काही दिवसांपासून तयार होत असल्याने ढगफूटी सदृश्य पाऊस होत असल्याची माहिती पुणे वेध शाळेने दिली. आज देखील पुण्यात जोरदार पाऊस झाल्याने अनेक रस्ते पाण्याने तुंबल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.






