Pune Porsche Car Case : पुण्यातील घटनेबाबत राहुल गांधीनी पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केला संताप; म्हणाले…

0
18
Pune Porsche Car Case : पुण्यातील घटनेबाबत राहुल गांधीनी पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केला संताप; म्हणाले…


काय म्हणाले राहुल गांधी –

दरम्यान यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करत पुण्यातील घटनेवर आपला संताप व्यक्त केला आहे. राहुल गांधी यांनी म्हटले की, मोदी दोन हिंदुस्तान निर्माण करत आहेत. एक अब्जाधीशांचा व एक गरीब जनतेचा.बस ड्रायव्हर, ट्रक ड्रायव्हर, ओला, उबर यांच्याकडून चुकून अपघातात कोणाचा मृत्यू झाला, तर त्यांना १० वर्षांची शिक्षा होते. मात्र श्रींमत घरातला १६ , १७ वर्षांचा मुलगा मद्य प्राशन करून पोर्शे कार चालवतो आणि दोन लोकांची हत्या करतो. तर त्याला सांगितलं जातं की निबंध लिहा.जर एखाद्या ट्रक चालकाने किंवा अन्य वाहन चालकाने एखाद्याला उडवल्यास १० वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे. मात्र एका अब्जाधीशाच्या मुलाने दोघांचा जीव घेतल्यावर त्याला निबंध लिहायला सांगितले. ट्रकचालक, ओला-उबर चालकांकडून असे निबंध का लिहून घेतले जात नाहीत. एका मुलाखतीत पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारण्यात आला की, देशात श्रीमंत आणखी श्रीमंत व गरीब आणखी गरीब बनत आहेत. त्यावर मोदी म्हणतात की, मग काय सर्वांना गरीब बनवू.  प्रश्न हा नसून न्यायाचा आहे. श्रीमंत व गरीबांना समान न्याय मिळायला पाहिजे. याचसाठी आम्ही लढत आहे. अन्यायाविरोधात लढत आहोत.



Source link