
पुणे पोलीस आयुक्तांनी निलंबित केलेले राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी हे येरवडा पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. अपघात झाला त्या रात्री हे दोघे त्या ठिकाणी ड्युटीवर तैनात होते. अपघात झाल्यानंतर त्यांनी कंट्रोल रूमशी संपर्क केला नाही, तसेच नाईट राऊंडवर असलेल्या पोलीस उपायुक्तांनाही याची माहिती दिली नाही. त्यामुळे या दोघांचा हेतू नेमका काय होता, त्यांनी ही माहिती का लपवून ठेवली याचीही चौकशी करण्यात येणार आहे.