Pune Porsche Accident: आरोपीच्या वाढदिवसानिमित्त आजोबाने दिली होती कोट्यवधीची आलीशान पोर्शे कार; मित्राची पोलखोल

0
22
Pune Porsche Accident: आरोपीच्या वाढदिवसानिमित्त आजोबाने दिली होती कोट्यवधीची आलीशान पोर्शे कार; मित्राची पोलखोल


Pune Porsche Accident: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, १९ मे रोजी पुण्यातील अगरवाल या बड्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव आलीशान पोर्श कार चालवत दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना धडक दिली होती. यात दोन अभियंत्यांना जीव गमवावा लागला होता. ही आलीशान कार आरोपीच्या आजोबाने त्याला वाढदिवसानिमित्त दिली असल्याचे तपसात उघड झाले आहे. दोन महिन्यांपूर्वीच आरोपीने व्हॉट्सॲप ग्रुपवर कारचा फोटो शेअर करून याची माहिती मित्रांना दिली होती. आरोपीचे आजोबा आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनी त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला ही महागडी भेट दिली होती.



Source link